सार्थक सेवा सन्मान
समाजात एखादा सकारात्मक बदल घडवायला सर्वात महत्वाची ठरते ती म्हणजे एखाद्या व्यक्तीने कींवा अनेकांनी हा चांगला बदल घडवण्यासाठी सातत्याने केलेली क्रुती, जी नंतर एखाद्या चळवळीत कींवा मोठ्या कार्यामधे रुपांतरीत होते.
विचारातून क्रुती व क्रुती तून चळवळ, चळवळीतून कार्य व त्यातून घडून आलेला सामाजिक बदल हा एक मोठा प्रवास आहे व तो सहज सोपा अजिबात नाही.. अनेक खाच खळग्याने व आव्हानाने भरलेला आहे. अनेक चांगल्या व्यक्ती अतिशय उत्तम उद्देश व स्वप्न घेऊन सामाजिक कार्याचा श्रीगणेश करतात, आत्यंतिक तळमळीने व जिद्दीने एखादा सकारात्मक बदल घडवायचा प्रयत्न करतात, पडत धडपडत आपले काम नेटाने पुढे नेतात,यशस्वी होतात.

अशा या संघर्षमय दिवसांमधेच खरी गरज असते ती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहण्याची. त्यांना मदत करण्याची, आर्थिक, व्यवहारीक सल्ला मसलतीची, तज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाची आणि केलेल्या कामाच्या प्रशंसेची, पाठीवरच्या शाबासकीची! त्यांनी उत्तरोत्तर प्रगती करावी या करता पुढे केलेल्या मदतीच्या हातांची!

सार्थक सेवा व सार्थक सेवा सन्मान ह्या पुरस्काराचा खरा उद्देश व स्वरूप हेच आहे. चांगल्या व्यक्तिच्या कींवा संस्थेच्या कामाचा उचित गौरव करणे, त्यांना पुरस्काराच्या निमित्ताने आर्थिक मदत करणे, त्यांचे कार्य अनेकांपर्यंत पोहोचावे या करता प्रयत्न करणे, आपल्या अनुभवांचा व संपर्काचा फायदा त्यांना मिळवून देणे व जीथे आवश्यक तेथे मार्गदर्शन करणे…. थोडक्यात म्हणजे त्यांच्या पाठीशी उभे राहणे. एकमेकां सहाय्य करु अवघे धरु सुपंथ! हेच ब्रिद ठेवत चांगल्या माणसांना घेऊन पुढे जाणे. व या सर्व प्रवासात चांगल्या व्यक्ति व संस्था याच्याबरोबर जोडले जाणे, व चांगल्या गोष्टी आपणही शिकणे हे ओघाने आलेच!

सार्थक सेवा सन्मान दरवर्षी एखाद्या अशा व्यक्तीला कींवा संस्थेकरता दिला जाईल ज्यांनी समाजाला भेडसावणार्या अतिशय मूलभूत प्रश्नांकरता काम करायला सुरवात केली आहे. ज्यामुळे समाजात, विचारांमधे, सकारात्मक बदल घडवून आणता येऊ शकतो.

या पुरस्काराकरता सेवाभावी संस्थांकडून व व्यक्तिगत सामाजिक कार्यासाठी पुरस्काराकरिता 31 मे पर्यंत खालील फाँर्म भरुन पाठवायचा आहे.

हा पुरस्कार 1 लाख रुपये, मानपत्र अशा स्वरुपात असून संस्थेबरोबर भविष्यात सहयोगाने सामाजिक कामे करण्याची संधी आहे. तरी शक्य होईल तेवढे लवकर फोर्म भरून जमा करावा. तसेच आपल्या ओळखीच्या संस्थेला व व्यक्तिला पाठवावा ही विनंती! दरवर्षीप्रमाणे आँगस्ट महिन्यात, आमच्या वर्धापनदिनाच्या दिवशी हा पुरस्कार जाहीर करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी, व काही मदत लागल्यास खालील नंबर वर संपर्क करावा.
स्वप्नील - ९३७०१६८६११ ऑफिस - ९७६६०७८१४६
sarthakfoundation.seva@gmail.com

याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून फोर्म भरायचा आहे.
https://forms.gle/nvaXYijE4Ua1vNqf7